HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेंची क्राईम ब्राँचमधून बदली, गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

मुंबई | वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठणार, असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषित केले आहे. तर, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपनं काल विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विरोधक मात्र अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कारवाई स्थगित करण्यात आली.अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली.

मात्र यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली. अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारावई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, काल (९ मार्च) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा मुद्दा उचलत सभागृहात प्रचंड गजारोळ केला होता. तसेच, त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाबही वाचून दाखवला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजपचे ‘हे’ नेते दिल्लीच्या दिशेने रवाना

Aprna

महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल !

News Desk

ओला इलेक्ट्रीक स्कूटर कंपनीकडून बीड जिल्ह्यातील ग्राहकाची फसवणुकीचा आरोप

Aprna