HW News Marathi
महाराष्ट्र

रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज कनेक्शन सापडल्यानंतर चौकशी दरम्यान ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केली. रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिची रवानगी आज (९ सप्टेंबर) भायखळा तुरुंगात होणार आहे.

काल (८ सप्टेंबर) अटकेनंतर रियाची सायन हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आली. यानंतर तिला NCB च्या ऑफिसमध्ये नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्स घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. रियाला आज भायखळा जेलमध्ये घेऊन जातील. तर आज तिचे वकील सतिश मानेशिंदे सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती आहे.

रियाच्या जामिनासाठी तिचे वकील सेशन्स कोर्टात (सत्र न्यायालय) जाणार आहेत. वकील सतीश मानेशिंदे आज सकाळी 10 वाजता सत्र न्यायालयात अपील करतील. भायखळा तुरुंगात नेण्यासाठी सकाळी 9 वाजताची वेळ नियोजित असली, तरी एनसीबी कोर्टाच्या निर्णयासाठी थांबू शकते. त्यामुळे भायखळा तुरुंग की घर असे दोन मार्ग रियासमोर असतील. सेशन्स कोर्टात तिला जामीन न मिळाल्यास हायकोर्ट आणि पुढे सुप्रीम कोर्ट हे पर्याय असतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगणाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख!

News Desk

खडसेंना त्यांच्या कष्टाची नोंद घेतली नाही असं वाटतं असेल तर… शरद पवारांची खडसेंवर प्रतिक्रिया  

News Desk

वैद्यनाथ कारखान्याच्या चोरी प्रकरणातराष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचे निष्पन्न!

News Desk