सातारा | पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवाताडे हे विजयाच्या उंबरठ्यावर जवळपास पोहोचले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यापेक्षा सुमारे 4395 मतांची आघाडी घेतली आहे. या पार्श्वभुमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावरुनच भाजपचे आमदार निलेश राणे यांनी अजित पवारांना टार्गेट केले आहे. ट्विट करत अतिशय बोचऱ्या शब्दांत टीका केल्या आहेत. “अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगालमध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग?”, असे टिवि्ट केले आहे.
त्या अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगाल मध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग?
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 2, 2021
सेनेचे मंत्री म्हणतात, ‘लाश वही है सिर्फ कफन बदला गया’
आमदार निलेश राणे म्हणतात महाराष्ट्रमध्ये पंढरपूरची सीट राखता राखता महाविकास आघाडीचे कपाळात आलेत आणि वार्ता छातीठोकपणे बंगालची करतायेत. अरे बंगालमध्ये बीजेपी हरली तरी ३ वरून १०० जवळ चालले तुम्ही साले ३ पक्ष एकत्र येऊन सुद्धा पंढरपूर पोटनिवडणुकीत बीजेपी ने तुमचा घाम काढला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.