HW News Marathi
देश / विदेश

केरळ, आसामात सत्ताधाऱ्यांना जनमत, तामिळनाडूत सत्तांतर, पुदुचेरीत मात्र सस्पेन्स कायम

तामिळनाडू | देशात ५ राज्यांच्या निवडणूकीच्या मतमोजणीची आज (२ मे) रणधुमाळी सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा विजय झाला आहे. तसेच, महाराष्ट्रात पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय जवळपास झालं आहे. तर दुसरकीडे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून एम. के. स्टॅलिन यांचा द्रविड मुनेत्र कळघम निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.

सध्या द्रमुक पक्षाचे उमेदवार 123 ठिकाणी आघाडीवर असून त्यांच्या प्रतिस्पर्धी अण्णाद्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे उमेदवार 78 ठिकाणी पुढे असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर सुरू असल्याचं दिसून आलं आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. येथे बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे.

केरळ

पश्चिम बंगाल वगळता इतर तीन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेनं बहुमत दिलं आहे. एलडीएफने ९३ जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे. यूडीएफ ४३ जागांवर आघाडीवर आहे.

आसाम

आसामात सत्ता भाजपानं दणदणीत घरवापसी केली आहे. काँग्रेस आणि भाजपात चुरस होती. मात्र, भाजपानं सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. भाजपाने बहुमताचा आकडा पार करत ७७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४८ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपाला स्पष्ट जनमत मिळताना दिसत आहे.

तामिळनाडू

सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात तामिळनाडूमध्ये लढत बघायला मिळाली. सुरूवातीला दोन्ही आघाड्यांमध्ये अटीतटीची लढत सुरू झाली. मात्र, नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूतील जनतेनं द्रमुकच्या पदरात मतं टाकत स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. द्रमुक १४१ जागी आघाडीवर आहे. तर सत्ताधारी अण्णाद्रमुक ८९ जागांवर आघाडीवर आहे.

पुदुचेरी

३० सदस्यसंख्या असलेल्या पुदुचेरी विधानसभा निवडणुकीचे निकाल दुपारनंतरही स्पष्ट झालेले नाहीत. पुदुचेरीत कुणाची सत्ता येणार याचा सस्पेन्स कायम असून, भाजपा १३ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने ६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर एका जागेवर अपक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे पुदुचेरीतील चित्र स्पष्ट होण्यासाठी मध्यरात्र होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिथुन चक्रवर्ती यांचा भाजप प्रवेश, पश्चिम बंगालसाठी स्टार प्रचारक ठरण्याची शक्यता…

News Desk

माणसांचे मांस खाणारे नरभक्षक जोडपे अटक

News Desk

पी व्ही सिंधू ‘सुवर्ण’ पदकाच्या शर्यतीतून बाद, भारताच्या पदरी निराशा!

News Desk