HW News Marathi
महाराष्ट्र

स्टीअरिंग नातवाच्या हातात, तर आजोबा शरद पवारांचे नातवाला ड्रायव्हिंगचे धडे

मुंबई | राजकीय वर्तृळातील पवार कुटुंब हे अनेक कारणांसाठी चर्चेत असते. दरम्यान, याच कुटुंबातील एक सदस्य म्हणजे खासदार सुप्रिया सुळे अनेकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या कौटुंबिक आनंदात इतरांना सहभागी करुन घेता असतात. मग तो त्यांचे भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असो, किंवा रक्षाबंधन. यावेळी त्यांनी त्यांचे पुत्र विजय सुळे यांना ड्राईव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतरच्या पहिल्या ड्राईव्हचा आनंद साजरा सगळ्यांसोबत फेसबुकच्या माध्यमातून साजरा केला आहे.

विजय सुळे यांनी आई सुप्रिया सुळे आणि आजोबा शरद पवार यांना पहिल्यांदा ड्राईव्हवर नेले आहे. शरद पवार शेजारच्या सीटवर बसून नातवाच्या ड्राईव्हिंगचा आनंद घेताना या व्हिडीओत दिसत आहेत, तर मध्येच नातवाला ते ड्राईव्हिंगचे धडे देतानाही दिसतात. सुप्रिया सुळे यांनी मागे बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला.

“आपली मुलं जेव्हा मोठी होतात, गाडी चालवायला शिकतात, तेव्हा वेगळा आनंद पालक म्हणून होतो, आज विजय सुळे, ज्यांना लायसन्स मिळाले आहे- लर्निंग आणि फायनल, तो त्याच्या आजोबांना ड्राईव्हला घेऊन चालला आहे” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. “हळूहळू, हॉर्न उगाच वाजवू नका स्पीड लिमिट काय माहित आहे ना?” अशा काही सूचनाही सुप्रिया सुळे मुलाला देताना ऐकू येत आहेत. “सगळ्यांना छोट्या वाटत असल्या तरी आईसाठी मोठ्या गोष्टी असतात. इट्स अ स्पेशल मुमेंट फॉर अस” असे सुप्रिया सुळे यांनी दीड मिनिटांच्या फेसबुक लाईव्हमध्ये अखेरीस म्हटले आहे. राजकीय आखाड्यापासून दूर असल्याने त्यांचे फारसे दर्शन घडत नाही.

https://www.facebook.com/supriyasule/videos/338964057302033/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी हातात मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले!

Aprna

Poladpur Bus Accident: आंबेनळी घाटात दरीत बस कोसळली

News Desk

कृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार

News Desk