HW News Marathi
महाराष्ट्र

“दरेकरांचं जाकिट बघून कोरोना म्हटला असेल जाकीटातून कुठे आत शिरु” -अजित पवार

मुंबई | राज्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे सगळ्यांसाठीच तो चिंतेचा विषय ठरला आहे. दरम्यान, याविषयी राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात देखील उल्लेख केला होता. त्यावर बोलताना विधिमंडळाचं वरीष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेमध्ये आज (४ मार्च) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन दिलं. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाची सविस्तर आकडेवारी आणि राज्य सरकारकडून यासंदर्भात केलेल्या आणि केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी अजित पवारांची राजकीय टोलेबाजी पुन्हा ऐकायला मिळाली आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोना झाला नसल्याचं सांगतानाच दरेकरांच्या जाकिटमुळेच त्यांना करोना झाला नसेल असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता.

“एका गोष्टीचं मला विशेष वाटतं…!

”राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यातला मृत्यूदर सुदैवाने घटला आहे. करोना झाला तर बऱ्याच लोकांना हॉस्पिटलला जावं देखील लागत नाही. बरेच जण घरच्या घरी औषधं घेऊन बरे होत आहेत. आज देखील आमच्या मंत्रिमंडळातले ७ ते ८ मंत्री आणि दोन्ही बाजूचे काही मान्यवर आमदार करोनाग्रस्त आहेत”. अजित पवार पुढे म्हणाले, “एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना नाही झाला. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल. किंवा त्यांचं (प्रवीण दरेकर) जाकिट बघून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं असंही काही झालं असेल तर माहीत नाही”, असं अजितदादा म्हणाले आणि दोन्ही बाजूकडून या कोटीला खळखळून दाद मिळाली.

“..नाहीतर माझ्या नावावर पावती फाडू नका!”

“पण तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या करोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली आणि म्हणून करोना झाला, असं म्हणून माझ्या नावावर पावती फाडू नका”, असं म्हणत अजित पवारांनी टोमणा मारला. तितक्यात मागून एका सदस्याने ‘प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना करोना झाल्याचं’ म्हणताच अजित पवारांनी “प्रसादने (भाजपा आमदार) मलाही जॅकेट दिलं होतं”, असं म्हणत सूचक इशारा केला आणि सभागृहात पुन्हा हशा पिकला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अक्कलकोटमध्ये हनुमानाची ध्यानधारणा

News Desk

“आरक्षणावर MIM चे दोन आमदार ५ वर्षे गप्प का होते?”; काँग्रेसचा सवाल

News Desk

HW Exclusive : पत्रकाराच्या अटकेप्रकरणी काय म्हणाले अमोल कोल्हे ?

News Desk