HW News Marathi
व्हिडीओ

मुनगंटीवारांचा थेट अजित पवारांविरोधात हक्कभंग दाखल, ‘हे’ आहे कारण

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे..अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सरकार आणि विरोधी पक्षात खडाजंगी पाहायला मिळाली होतीच..गेले २ दिवस भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर अनेक विषयांवरुन निशाणा साधला होता…तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सुनावले होते…आज भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. महाराष्ट्र विधानसभेचं कामकाजाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी मुनगंटीवारांनी अजित पवारांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला. त्यानंतर हक्कभंगाचा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्याचे निर्देश प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले. अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं 15 डिसेंबर 2020 रोजी आश्वासन दिले होते. सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला.

#SudhirMungantiwar #AjitPawar #Mahavikasaghadi #bjp #ncp #vidhansabha #maharashtra #uddhavthackeray #sharadpawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uttar Pradesh | योगींच्या पोलिसांचा कारमाना हिंदुला मुस्लिम बनवून केली अटक

News Desk

पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द, गृहमंत्र्यांची माहिती

Gauri Tilekar

आरटीआयचा परिणाम, विधानसभेमध्ये भरले रिक्त पद

Atul Chavan