HW News Marathi
महाराष्ट्र

मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलचा दर किती आणि आता किती?,अर्थसंकल्पात बोलेनच, अजित पवार बरसले

मुंबई | पेट्रोल, डिझेलच्या किमती आभाळाल्या भिडल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या खिशाला न परवडण्यासारखी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या इंधन दरवाढीचा मुद्दा महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातत्याने चर्चिला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील पेट्रोल डिझेलच्या दराचा दाखला देत केंद्र सरकारवर तसंच भाजपवर शरसंधान साधलं तसंच ८ तारखेला मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात मी याविषयावर बोलेनच, असंही सुनावलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“पेट्रोलवर केंद्र सरकारने लावलेले कर किमतीपेक्षा जास्त आहेत, असा आरोप करत या राज्य सरकारने पूर्वीच्या सरकारने ठेवलेले दर कायम ठेवले आहेत, असं अजित पवार म्हणाले. पेट्रोलचे डिझेलचे सध्याचे आंतराष्ट्रीय बाजार प्रति बॅरल ६३ डाॅलर असताना इतके दर वाढत आहेत. मनमोहन सिंग यांच्या काळात प्रति बॅलर १०३ डॉलर होते”, असंही अजित पवार सांगायला विसरले नाहीत.“केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपेक्षा जास्त कर लावले आहेत.

आम्ही अधिकचे टॅक्स लावलेले नाहीत. ते पहिलेच आहेत, आम्ही यामध्ये अजिबात जास्तीचे कर लावलेले नाहीत. आमची टॅक्स लावायची भूमिका नाही”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.राज्यपालांनी १२ आमदारांच्या प्रस्तावावर अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यपालांनी सामंजस्य भूमिका दाखविली तर राज्यात वातावरण चांगलं राहील. संबंधित १२ लोकांना देखील कायद्याने आणि घटनेने सभागृहात बसण्याचा अधिकार दिला आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू! कॉंग्रेस नेत्याच्या निकटवर्तीयांचा आरोप

News Desk

‘राज्यात भाजपचे सरकार यावे ही गणरायाची इच्छा, बाप्पा ती लवकरच पूर्ण करतील’; गिरीश महाजनांना विश्वास!

News Desk

“मी राजवाडा सोडून शेतकऱ्याच्या बांधावर आलोय, मंत्र्यांनी यावं की नाही हा त्यांचा प्रश्न” – संभाजीराजे

Manasi Devkar