HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर CBI च्या विशेष पथकानं हैदराबादला जाऊन रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला

मुंबई | फोन टॅपिंग प्रकरणी तपासात गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना समन्स बजावलं होतं. पण रश्मी शुक्ला यांनी आपण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहू शकणार नसल्याचं एका पत्राच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना कळवलं होतं. परंतु, सीबीआयनं रश्मी शुक्ला यांचा जबाब अखेर नोंदवला आहे. सीबीआयच्या एका विशेष पथकानं हैदराबादला जाऊन रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याची माहिती मिळत आहे.

चौकशीला हजर राहू शकत नाही असं रश्मी शुक्ला यांनी कळवल्यानंतर सीबीआयचं एक पथक हैदराबादला रवाना झालं. तिथे रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला. जवळपास तीन ते चार तास त्यांची चौकशी करण्यात आली. फोन टॅपिंग प्रकरणी नेमकं काय झालं होतं, यासंदर्भात माहिती दिली होती.शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत, महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचं रॅकेट उघडकीस आणलं होतं. फडणवीस यांनी असा आरोप केला होता की, काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने अनेक पोलीस अधिकारी इच्छित पोस्टिंग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत.

रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा अहवाल मुख्यमंत्र्यांनाही पाठवला होता. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच यासंदर्भात त्यांनी कारवाईची मागणी केली होती. फोन टॅपिंग झालं तेव्हा सीताराम कुंटे हे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते.

आपल्याकडून या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचं कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. तसंच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचंही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा! – देवेंद्र फडणवीस

Aprna

MPSCExam : राजकीय स्वार्थाला बळी पडू नका – आदित्य ठाकरे

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार पंतप्रधानांशी चर्चा!

News Desk