HW News Marathi
Covid-19

“मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच…”, बहिण पंकजाला कोरोना भाऊ धनंजय मुंडेची भावनिक पोस्ट

मुंबई | भाजप नेत्या आणि पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याची ट्विट करत माहिती दिली. त्यांच्या या ट्विटनंतर पंकजा मुंडे यांचे बंधू आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी बहिणीसाठी एक भावनिक ट्विट केले आहे. यात त्यांनी मोठा भाऊ म्हणून कायमच तुमच्या सोबत असल्याचंही म्हटलं नाही. मुंडे भावा- बहिणींमधील वाद सगळ्यांना माहिती आहेच. पण अशा कठिण प्रसंगी भावाची अशी बहिणीसाठीची पोस्ट वाद बाजूला साधत नातं महत्वाचं असणारी दिसते. जरम्यान, धनंजय मुंडे यांना एकदा नाही तर २ वेळा कोरोना होऊन गेला आहे.

काय आहे धनंजय मुंडे यांचं ट्विट?

“ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केला आहे, यामुळे होणाऱ्या त्रासांची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करुन घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकर बऱ्याच व्हाल. काळजी घ्या”, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

या आधीही भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना कोरोना सदृश्य लक्षण जाणवत असतानाही भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्यास सांगितले होते. प्रीतम मुंडे यांना कोरोनासदृश लक्षणं जाणवत आहेत. त्यामुळे सध्या त्या क्वॉरन्टाईन आहेत. ही गोष्ट समजताच धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली त्यांनी एक भावनिक ट्विट केलंय. “बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो,” असे धनंजय मुंडे यांनी आल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

मुंडे भावा बहिणीतील शाब्दिक युद्ध

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामधील कोरोनास्थितीवरुन धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात चांगलीच शाब्दिक लढाई रंगली होती. बीडमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यात आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यात धनंजय मुंडे अपयश ठरल्याची टीका करत प्रीतम मुंडे यांनी केली होती. तसेच, धनंजय मुंडे यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला होता. तर धनंजय मुंडे यांनी खासदार प्रीतम मुंडेंवर पलटवार करत त्यांना अचानक जिल्हयात आल्यानं उशिरा शहाणपण आल्याचा टोला लगावला होता. मात्र, असे असले तरी आता धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडेंच्या आणि पंकजा मुंडेंच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! राज्यात १४ लाखांहूनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk

महाराष्ट्रात आज ३००७ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

बिल गेट्स यांनी पत्रातून भारताबद्दलची भावना व्यक्त केली

News Desk