HW News Marathi
महाराष्ट्र

गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी, मनसेची मागणी

मुंबई | राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमूळे हळूहळू लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहेत. मात्र, पुर्णपणे लोकांना प्रवासाठी मुभा दिली नाही आहे. यावरुन आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे एक मागणी केली आहे. ज्या रुग्णांना गंभीर आजार आहे अशा रुग्णांना आणि नातेवाईकांना प्रवासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सध्या लोकलने प्रवास करण्याची मुभा अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच देण्यात आली आहे. गंभीर वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेच्यावतीने राज्यसरकार व रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, यावर राज्यसरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुन्हा महाराष्ट्रात आणि मुंबईत घडला, त्यामुळे महाराष्ट्र सरकारची एनओसी घ्यावी – अनिल परब

News Desk

मेहबूब शेख प्रकरण तपासासाठी महिला अधिकाऱ्याकडे सोपवा, नीलम गोऱ्हेंची मागणी

News Desk

‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ नवाब मलिकांचा पुन्हा एकदा वानखेडेंवर निशाणा!

News Desk