HW News Marathi
व्हिडीओ

संजय राठोडांचं मंत्रिपद अजूनही कायम? “मुख्यमंत्री खोटारडे” म्हणत विरोधक पुन्हा आक्रमक

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी तीन दिवसांपूर्वी वनमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राठोड यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झाल्यानं त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव होता. त्यातच सोमवारपासून (१ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असल्यानं विधिमंडळात विरोधकांकडून या विषयावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राठोड यांचा राजीनामा घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरीही तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारून ३ दिवस होत आले आहेत. मात्र राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला गेलेला नाही.नेमके काय आहे प्रकरण ? पाहूया

#SanjayRathod #UddhavThackeray #DevendraFadnavis #AtulBhatkhalkar #PoojaChavan #SuicideCase #ChitraWagh #AjitPawar #CMOMaharashtra #BhagatSinghKoshyari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

West Bengal, Mumbai | पश्चिम बंगाल घटनेच्या निषेधार्थ मुंबईत भाजपचे निदर्शनं

News Desk

Shivsena-BJP alliance | शिवसनेने लाचारी पत्करली- अशोक चव्हाण

News Desk

शरद पवारांनी घेतली मोदींची भेट! काय घडलं भेटीत?

News Desk