मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. त्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचारही घेतला होता. आता काँग्रेसने भाजपला या प्रकरणात लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राम कदमांवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. ट्विटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, “म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्विट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आपल्या मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे, असे सचिन सावंत म्हणाले आहेत.
@KanganaTeam is in fact Kangana + #BJP IT Cell! BJP is working behind curtains. This ungrateful lady along with BJP MLA have insulted 13 crores Maharashtrians,106 martyrs who laid their lives for Mumbai, Rani Lakshmibai & those all who love #AmchiMumbai
at the behest of #BJP— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 4, 2020
विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग्ज विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणीवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, ही आमची मागणी आहे.
मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरावे आपल्या राज्यात जावं. हा काय तमाशा चाललंय, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर तातडीने उत्तर दिलं पाहिजे, मग ते कोणीही असेल. या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.