HW News Marathi
Covid-19

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस दिली जाणार?

मुंबई | १ मेपासून केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती, मोफत लसीकरण, लॉकडाऊन याचसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

दरम्यान, या बैठकीत राज्यातील मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असून त्यानंतरच मुख्यमंत्री यासंदर्भातील निर्णय जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानुसार आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवरही चर्चा होणार का? हे पाहणे अतिशय महत्वाचं असणार आहे.

देशभरात १ मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांचा मोफत लसीकरण करण्यात आलं होतं. मात्र १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशातच देशातील अनेक राज्यांनी १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार, हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्क सारखी अवस्था झाली असती

News Desk

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

News Desk

२५ आणि २६ जुलैला नागपुरात जनता कर्फ्यु !

News Desk