HW News Marathi
Covid-19

राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारा सुरु आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सुनील केदार यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणे असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नुकतंच त्यांनी मुंबईतील गोरेगावच्या शासकीय महानंद डेअरी येथे भेट दिली होती. यावेळी त्यांनी संचालक मंडळ आणि सदस्य यांच्याशी चर्चा केली. महानंदाच्या संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. महानंदच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची संपूर्ण माहिती घेतली होती. दरम्यान, राज्यात सामान्य लोकांसोबतच लोकप्रतिनीधींनाही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना चाचण्यांच्या दरात घट, आरोग्य विभागाचा निर्णय

News Desk

मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन हवा – महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

पंकजांनी फोनवरून केली धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस

News Desk