HW News Marathi
Covid-19

गेल्या २४ तासात सर्वाधिक ८,९०९ रुग्णांची नोंद, तर देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ओलांडला २ लाखांचा टप्पा

मुंबई | देशात २४ तासात ८ हजार ९०९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर २१७ जणांचा कोरोनामुळे प्राण गामावले आहे. यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७ हजार ६१५ वर पोहोचली आहे. तसेच देशात ५ हजार ८१५ जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४ हजार ७७६ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तसेच देशात आतापर्यंत १००, ३०३ लोकांनी कोरोनावर मात केली आहे देशाचा रिकव्हरी रेट ४८.३१ टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख १ हजार ४९७ आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

देशात कोरोना बाधितांची संख्या १९ मे रोजी १ लाख १ हजार १३९ एवढी होती. त्यापैकी ३ हजार १६३ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर १५ दिवसांनंतर म्हणजे देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने २ लाखांचा टप्पा पार केला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. तर दुसरीकडे देशात रिकव्हरी रेट देखील वाढत असल्यामुळे काहीसा दिलासा देणार बातमी आहे. १९ मे रोजी १ लाखहून अधिक रुग्णांपैकी ३९ हजार जणांनी कोरोनावर मात केली. म्हणजेच १९ मेपर्यंत रिकव्हरी रेट ४० टक्के होता. तर ३ जनूपर्यंत २ लाख रुग्णांपैकी १००, ३०३ लोक कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे आता देशाता रिकव्हरी रेट ५० टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वााधितक आहे. राज्यात काल (२ जून १ हजार २२५ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर सध्या राज्यभरात ३१ हजार ३३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात काल एका दिवसात २ हजार २८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर सध्या राज्यात ३८ हजार ४९३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७२ हजार ३०० वर पोहोचली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगाला धीर देण्यापेक्षा घाबरवण्याचं काम का करताय ? WHOला आव्हाडांचा सवाल

News Desk

कोविडच्या पार्श्वभूमीवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकर कार्यान्वित करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Aprna

राज्यात आता ५ कोरोना हॉटस्पॉट, राजेश टोपेंची माहिती

News Desk