HW News Marathi
महाराष्ट्र

द्वेष व हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप आमदाराच्या फेसबुकवर बंदी !

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर भाजपची पाठराखण केल्याचा गंभीर आरोप देशातील विरोधी पक्षातून केला जात होता. भडकावू भाषण प्रकरणात कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोपानंतर फेसबुकने भाजपा आमदारावर कठोर कारवाई केली आहे. तेलंगणा येथील भाजपचे आमदार टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. द्वेष व हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या आशयावरील फेसबुकच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल भाजप नेत्यावर बंदी घातली आहे.

“आमच्या व्यासपीठावर हिंसा आणि द्वेषाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल आम्ही राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घातली आहे. ते म्हणाले की संभाव्य उल्लंघन करणार्‍यांना शोधून काढणे आणि त्याची मूल्यांकन करण्याची प्रक्रिया “व्यापक” असून याअंतर्गत फेसबुकने त्यांचे खाते हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मन की बातमधून मराठमोळ्या वेदांगी कुलकर्णीचे मोदींकडून कौतुक

News Desk

शेतकऱ्यांसाठी मी लढतोय, पळपुटेपणा केला नाही – सदाभाऊ खोत

News Desk

पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती

News Desk