HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी मी लढतोय, पळपुटेपणा केला नाही – सदाभाऊ खोत

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रयत क्रांती संघटन सदैव तत्पर आहे. कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे दुखः समजून घेत त्यांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक गावात रयत क्रांतीचे आरोग्य बुथ उभारा. रुग्णांना घेऊन मुंबईला या, त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची आम्ही व्यवस्था करणार असल्याचे कृषी व फलोत्पादन, पणन, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले. या मेळाव्यास बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, मजुर, रयतक्रांती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, की गेल्या 30 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढत आहे. पण कधी कार्यकर्त्यांना समोर करून त्यांना पोलिसांच्या लाठ्या खाऊ देऊन आपले पेपरात फोटो छापून आणले नाहीत. अशी नाटकी आंदोलने आम्ही केली नाहीत. पण काही जण ते करण्यात पटाईत आहेत. काही जण म्हणतात सदाभाऊंना सत्तासुंदरीची भुरळ पडली. पण शासकीय बंगल्यात हॉलध्ये सतरंजीवर झोपणारा सदाभाऊ आहे. काही जण म्हणतात सत्तेला लाथ मारली…पद सोडलं…पण त्यांच्या सारखा पळपुटेपणा मी केला नाही. अरे रणांगण कशाला सोडायचं. सरकारमध्ये राहुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थांबलो असून शेतकऱ्यांसाठीच लढतोय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतांना कार्यकर्त्यांना पुढे करून आम्ही कधी नाटकी आंदोलने केली नाहीत. शेतकऱ्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी मर्दा सारखा लढलो. पोलिसांच्या अनेक काठ्या खाल्या, पण हार मानली नाही.

काही जण म्हणतात सदाभाऊंना सत्तासुंदरीची भुरड पडली. पण मुंबईला येऊन पहा. माझ्या बंगल्यात मी केवळ दोन-तीन दिवस राहतो. माझा बंगला हा राज्यातील रुग्ण, शेतकरी व कार्यकर्त्यांसाठी सदैव खुला करून दिला आहे. हॉलमध्ये खाली सतरंजीवर झोपणारा हा सदाभाऊ असून मंत्री पदाचा तोरा दाखवित तुमच्या सारखी नाटके आम्ही केली नसल्याचा हल्लाबोल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे नाव न घेता केला. खोत पुढे म्हणाले, की, ” शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण करून काही जण आपल्या दुकानदाऱ्या चालवित आहेत. पण माझा शेतकरी बांधव ऐवढा भोळा नाही. त्यांना तुमच्या “कथणी आणि करणी’ मधील फरक दिसतोय. कर्जमाफी, तुर, सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडे आग्रही भुमिका मांडून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात 1400 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावर सरकार शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करीत असून प्रती हेक्‍टरी पंधरा क्विंटल सोयाबीन स्विकारण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रयत क्रांती संघटन सदैव तत्पर आहे. कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे दुखः समजून घेत त्यांना मदतीसाठी पुढाकार घ्यावा. प्रत्येक गावात रयत क्रांतीचे आरोग्य बुथ उभारा. रुग्णांना घेऊन मुंबईला या, त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची आम्ही व्यवस्था करणार असल्याचे ते म्हणाले. या मेळाव्यास बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, मजुर, रयतक्रांती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शार्दुल जाधवर, युवा नेते सागर खोत, राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे, जितू अडेलकर, विनायक सरनाईक, प्रशांत ढोरे पाटील, दीपक सुरवडकर, संतोष राजपुत, विनायक पाटील, अरविंद पाटील, गजानन तुरे, अनंत आमले आदी पदाधिकारी उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे रयत क्रांती संघटनेतर्फे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंब्र्यात रुग्णालयाबाहेर भाजप-राष्ट्रवादीचा ड्रामा! किरीट सोमय्या आणि शानु पठाण आमनेसामने

News Desk

अजित पवार आणि अनिल परबांची CBI चौकशी करा, चंद्रकांत पाटलांचे थेट अमित शहांना पत्र

News Desk

राज्यातील ८४६ शाळांचा ‘पीएम श्री’ योजनेत सर्वांगीण विकास करणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

Aprna