HW News Marathi
Covid-19

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण…

गोवा | देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना सध्या देशात अनलाॅक ४.० अंतर्गत अनेक गोष्टी सुरू होत आहेत.सामान्यांना कोरोनाचा विळखा असताना लोकप्रतिनिधीही त्याला अपवाद नाहीत.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांन काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती ते कोरोनामुक्तही झाले आहेत . त्यानंतर आता गोव्याचे  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री सावंत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेशनचा  सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनीच ही माहिती ट्विटद्वारे दिली. मी माझी सर्व कामे घरातूनच करणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गोव्याने चांगले काम करत कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात ठेवला होता. मात्र नंतरच्या टप्प्यांमध्ये गोव्यातही करोनाचा संसर्ग पसरू लागला. अलिकडे देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गोव्यातील वर्दळ वाढू लागली. गोव्याने आपल्या सीमा खुल्या केल्या आहेत. त्यामुळे गोव्यात अनेक जण दाखल होत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट  – मुख्यमंत्री

News Desk

“पुर्ण लॉकडाऊन केला जर जनतेचा उद्रेक होईल”, फडणवीसांचा सरकारला इशारा

News Desk

राज्यात आज ६,५५५ नवे रुग्ण, १५१ जणांचा मृत्यू 

News Desk