मुंबई । सलग ३ वर्ष ग्रामीण विकासात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर राहिल्याबद्दल केंद्रसरकारने महाराष्ट्राचा गौरव केला होता त्याला आजच्याच दिवशी या क्षणाला बरोबर दहा वर्ष पूर्ण झाल्याचे ट्वीट करत आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या आठवणी जाग्या केल्या आहेत. २०१०, २०११ व २०१२ असे सलग राज्याचा ग्रामीण विकास मंत्री म्हणून जनतेच्यावतीने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
आदरणीय शरद पवार साहेबांनी २००९ ते २०१४ असे सलग पाच वर्ष राज्याच्या ग्रामीण विकास विभागाची जबाबदारी माझ्यावर दिली होती. या काळात ग्रामविकास विभागाने अनेक नाविन्यपूर्ण बदल आणत राज्याच्या ग्रामीण भागाला आधुनिक दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न केला, ज्याची दखल देश पातळीवर घेतली गेली. pic.twitter.com/nWscDhbZ9z
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 24, 2021
तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्राचा सन्मान स्वीकारणे, हा माझ्या जीवनातील एक अत्यंत आनंदाचा क्षण होता अशा शब्दात आपल्या आनंदाच्या भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. शरद पवार यांनी २००९ ते २०१४ असे सलग ५ वर्ष राज्याच्या ग्रामीण विकास विभागाची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर होती. या काळात ग्रामविकास विभागाने अनेक नाविन्यपूर्ण बदल आणत राज्याच्या ग्रामीण भागाला आधुनिक दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न केला, ज्याची दखल देश पातळीवर घेतली गेल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.