HW News Marathi
Covid-19

अदर पुनावाला डाकू ! भाजप आमदाराची मुक्ताफळे

मुंबई । सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशील्ड’ या लसीची किंमत ठरल्यानंतर गोरखपूरच्या भाजप आमदाराने मुक्ताफळे उधळली आहेत. गोरखपूरचे भाजप आमदार राधामोहनदार अग्रवाल यांनी आता अजब विधाने केली आहेत. “अदर पुनावाला हे डाकू असून केंद्र सरकारने साथीचे रोग कायद्या अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्यावी”, अशी खळबळजनक मागणी या भाजप आमदाराने केली आहे. .

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीची नवी किंमत ठरवल्यानंतर भाजप आमदार राधामोहनदार अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी अग्रवाल असे म्हणाले की, “अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत ताब्यात घेतली पाहिजे.” अग्रवाल यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

कोविशील्डची नवी किंमत काय?

सीरम इन्स्टिट्यूटने आपली कोव्हीशिल्ड ही लस राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस केल्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, कोव्हीशिल्ड ही लस जगातील इतर कोणत्याही लसींच्या किंमतींपेक्षा स्वस्त असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, FSIने अशीही माहिती दिली आहे की, “येत्या २ महिन्यांत लस उत्पादनाचा वेग वाढवण्यात येणार असून एकूण उत्पादन क्षमतेच्या 50 टक्के लस भारत सरकार लसीकरण मोहिमेला आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येईल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तो मान्यच, पण….! । अमृता फडणवीस

News Desk

राज्यात अजून १५ दिवसांच्या लॉकडाऊनची आवश्यकता – राजेश टोपे

News Desk

गाव अवघ्या १४ किलोमीटरवर होते आणि…

News Desk