HW News Marathi
महाराष्ट्र

बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, मनसेचा सरकारला टोला

मुंबई | आज (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिन असुन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. राज्य सरकारने मनसेनेच्या या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत. आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असा खोचक टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेकडून मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानात स्वाक्षरी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: येऊन सही करणार आहेत. यामध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होणार आहेत.

मात्र, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असून मनसे नेत्यांना सीआरपीसी १४९ अंतर्गत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तरीही मनसे कार्यक्रम घेण्यावर आग्रही आहे. आम्ही जबाबरीने योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रम पार पडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

‘मैदानावर खेळण्यास बंदी घालून कोरोना रोखता येणार नाही’

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारच्या कोरोनासंबधीच्या नियमांवर बोट ठेवले. कोरोनाच्या भीतीने राज्य सरकारने मुंबईतील ओव्हल मैदान बंद ठेवले आहे. मात्र, मैदानावर बंदी घातल्याने कोरोना कमी होत नाही. राज्य सरकारने याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करावा, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आंचल गोयल यांना पदभार घेण्यास कोण रोखत होतं?’ संजय जाधवांनी केला खुलासा

News Desk

फळभाज्यांचे भाव गगनाला

News Desk

‘होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा’ अहिल्यादेवींच्या वंशजांची गंभीर टीका

News Desk