HW News Marathi
महाराष्ट्र

अवघ्या १८ तासात २५ किमी डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये नोंद!

सोलापूर | सरकारी काम खूप धिम्या गतीने असतं, याचा अनुभव समस्त भारतीयांना आहे. पण भारतीयांच्या याच मानसिकतेला छेद देणारी एक बातमी समोर आली आहे. सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
सोलापूर ते विजापूर दरम्यान ११० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येत आहे. हा रस्ता चौपदरी आहे. पण या मार्गावर २५.५४ किमीचा रस्ता केवळ १८ तासांत तयार करण्याचा विक्रम संबंधित ठेकेदार कंपनीने केला आहे. यासाठी ५०० मजूरांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदार कंपनीचं आणि ५०० कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे.
यावेळी त्यांनी सांगितलं की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सोलापूर ते विजापूर या महामार्गावार ११० किमीचं काम सुरू आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता चौपदरी असून दळणवळाच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर ठरणार आहे. याच रस्त्यावरील २५.५४ किलोमीटर लांबीचा एक पदरी रस्ता अवघ्या १८ तासात तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाची नोंद लिम्बा बुक ऑफ रिकॉर्डमध्ये केली जाणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.
हा महामार्ग ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. सोलापूर ते विजापूर हा महामार्ग पूर्व महाराष्ट्र आणि कर्नाटक यांना जोडणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. NH५२ म्हणून ओळखला जाणाऱ्या या रस्त्यावर सोलापूर आणि विजापूर दरम्यान अनेक बायपास रस्ते काढले जाणार आहेत. तसेच या मार्गात सहा उड्डाणपूलही बांधण्यात येणार आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना दिलासा….

News Desk

‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

News Desk

माझ्या पुराव्यातील एकही कागद खोटा असेल तर…! किरीट सोमय्यांचं पवारांना मोठं आव्हान

News Desk