HW News Marathi
महाराष्ट्र

एमएसईबीचे कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन

पुणे | वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करताना ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचे कौतुक करताना “आत्मचरित्राची पानं वाढली” असे उद्गार राज ठाकरेंनी काढले.

पुण्यातील शिरुरमध्ये असलेले ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. बारा दिवसानंतर त्यांची सुटका झाल्यावर राज ठाकरे यांनी मनसैनिक सुशांत कुटे यांना फोन केला.

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलावरोधात मनसे आक्रमक झाली आहे. राज्याच्या अनेक भागात मनसेने आंदोलन छेडले आहे. कुठे वीज वितरणाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे, तर कुठे फलकांना काळे फासण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताच्या अवनी लेखराकडून आणखी नेमबाजीत रौप्यपदक!

News Desk

एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांची केंद्रात वर्णी

News Desk

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर राऊत यांना देशद्रोही विचारच सुचणार – अतुल भातखळकर

News Desk