HW News Marathi
महाराष्ट्र

नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका केली?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जीएसटीच्या थकबाकीवरुन राज्याच्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी “रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं”, असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी फेसबुकवर पोस्ट टाकून प्रत्युत्तर दिले आहे.

“रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं’, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची बातमी मी पाहिली. नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका का केली? याचं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे, बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं ‘अभ्यास’ करायला त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टीका केली असावी”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

“माझा त्यांच्याएवढा ‘अभ्यास’ नाही, पण मी वस्तुस्थिती मांडली. माझ्या कॅलक्युलेशनचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा देतो. मी नाराजीतून किंवा माझ्याविरोधात कुणी बोललं म्हणून नाही तर वस्तुस्थिती समोर यावी, शाब्दिक खेळ आणि राजकीय टीकाटिप्पणी होऊ नये म्हणून ही टिपणी देतोय”, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

“मला या विषयाचं राजकारण करायचं नाही किंवा करायची इच्छाही नाही. पण आज राज्याची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारकडून भरपाई देताना अनेक महिने उशीर होतोय. राज्यसमोर मोठं आर्थिक संकट आहे. अशा काळात दुसऱ्याच्या चुका शोधत न बसता आपण केलेली चूक सुधारण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे वेळेत जीएसटी भरपाई देण्याची आणि स्थानिक संस्था करापोटी माफ केलेली रक्कम आधारभूत महसूलात परिगणित करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे लावून धरावी. ती मान्य करुन घ्यावी”, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला.

“देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा जीएसटी भरपाई कायदा अभ्यासून कॅलक्युलेशन समजून घ्यावं. जनता त्यांच्याकडं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बघते. ते वकीलही आहेत. नगरसेवकापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे, याचं कौतुक आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी टीका जरुर करावी, सरकारच्या चुका निश्चित दाखवून द्याव्यात. त्यात तथ्य असेल तर त्यात सुधारनाही करता येईल”, असे रोहित पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंच्या चौकशीचे NCB महासंचालकांचे आदेश!

News Desk

सकल मराठा समाजाचा संघर्ष व बलिदानामुळेच आरक्षण !

News Desk

अमृता फडणवीसांच्या दाव्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया

News Desk