HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल-डिझेल दरवाढ धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका !  

मुंबई | देशातील इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर आता बोचरी टीका केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या एका वक्तव्यावर टीका करत संजय राऊत म्हणतात कि, “पेट्रोल-डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावणाऱ्यांना शोभत नाही”, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत आज (२६ फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी निर्मला सीतारामन यांच्या विधानाचा हा समाचार घेतला आहे.

इंधन दरवाढीचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पेटत असताना संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून आता केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. निर्मला सीतारामन यांनी “पेट्रोल-डिझेल दरवाढ हे धर्मसंकट आहे” असे म्हटले आहे. त्यावर टीका करताना संजय राऊत म्हणतात कि, ” पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. सत्ताही भाजपला श्रीरामाच्या म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे. लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल- डिझेल दरवाढ आहे. या दरवाढीसंदर्भातील धर्मसंकट यूपीए सरकारवरही होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे. तुम्ही तर पळ काढत आहात”, अशी बोचरी टीकाही केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दरवाढ कायम

News Desk

विमान दुर्घटनेत पर्यटन मंत्री रबींद्र अधिकारीसह ५ जणांचा मृत्यू

News Desk

घोटाळेबाज सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच ! सोमय्यांचा इशारा

News Desk