पुणे | संदीप सिंह यांचा भाजपशी संबंध आहे का, या काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. “विधानपरिषदेवर पाठवत नसल्याने सचिन सावंत फार निराशेतून बोलतात” असा निशाणा फडणवीसांनी साधला.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी होत असलेले निर्माते संदीप सिंह यांच्या भाजपशी संबंधावर सचिन सावंत यांनी सवाल उपस्थित केले होते. त्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “सचिन सावंत यांचं राज्य चाललं आहे ना? मग मुंबई पोलिसांनी या सगळ्यांना दूर का ठेवलं? या आरोपींना चौकशीसाठी का बोलावलं नाही? पहिल्या दिवसापासून आत्महत्या का म्हटलं?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
“संदीप सिंह दिग्दर्शक म्हणून विषय नाही, मी एखाद्या कार्यक्रमात गेलो असेन, पण त्याच व्यक्तीने मा. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बनणाऱ्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन किंवा निर्मिती केली होती, अशीही बातमी काही जणांनी ट्वीट केली होती. सचिन सावंत अलिकडे फार अभ्यास करत नाहीत, त्यांना विधानपरिषदेवर पाठवत नाहीत, म्हणून ते फार निराशेतून बोलतात” अशी टीका फडणवीस यांनी केली.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज नेक्ससमध्ये सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे. संदीप सिंह हे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे निर्माते आहेत, ज्या सिनेमाचे पोस्टर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी लाँच केले होते.” असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आज (२८ ऑगस्ट) केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.