HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असलेल्या हॉटेल व्यावसायिकाला ईडीने बजावली नोटीस

मुंबई | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला रोज नवे वळण येत आहे. सीबीआयच्या सूत्रांनुसार, रियाला तपासणी कुठे व्हावी यासाठी काही पर्याय देण्यात आले होते. त्यापैकी रियाने स्वत: डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये येण्यास तयार दर्शवली.आज (२९ ऑगस्ट) सीबीआय डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये रिया, शोविक चक्रवर्ती, नीरज आणि सॅम्युअल मिरांडा यांची चौकशी करत आहेत.

सध्या दुसऱ्या फेरीतील चौकशी सुरु आहे. यामध्ये रियाला सुशांतच्या औषधी, त्याचे डॉक्टर्स, प्रिस्क्रिप्शन, मेडिकल हिस्ट्री, सुशांतच्या कुटुंबाने जे आरोप केले आहेत त्याबाबत प्रश्न विचारले जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

काय विचारले प्रश्न?

सुशांतला कोणता आजार होता?

उचरासाठी तू सुशांतला कोणत्या डॉक्टरकडे नेलं?

सुशांतच्या आजाराबाबत त्याच्या घरच्यांना का नाही सांगितलं?

सुशांतला कोणते ड्रग्स देत होती?

सुशांतला दिलेले ड्रग कोण पुरवायचे?

८ जूनबाबत सुशांतच्या घरचे नोकर, मॅनेजरने जी साक्ष दिली आहे, त्याबाबतही रियाला प्रश्न विचारले जातील. एसपी नूपुर प्रसाद आणि तीन इंस्पेक्टर रियाची चौकशी करत आहेत. तर एसपी अनिल यादव हे शोविक चक्रवतीची चौकशी करत आहेत. वेळ पडल्यास सीबीआय यांना आमोरासमोर बसवून चौकशी करु शकते. रियाच्या त्या चॅटबाबत ज्यात ती ड्रग्सबाबत बोलत आहे., त्याबाबत पुढे चौकशी होऊ शकते. ८ जूनला रियाने सुशांतचं घर सोडल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत प्रत्यक्षदर्शींच्या साक्ष आणि विदेश टूरबाबत प्रश्न विचारले जात आहेत.

तसेच या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असलेल्या गोव्याचा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीने नोटीस बजावली आहे. ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुंबईतल्या ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहण्यासाठी गौरव आर्याला सांगण्यात आले आहे. गोव्यातल्या त्याच्या हॉटेलच्या गेटवर ही नोटीस लावण्यात आली आहे. गोव्याच्या गौरव आर्याने रिया चक्रवर्तीला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. गौरव हा गोव्यातील हॉटेल व्यवसायीक असून, अंजुना इथे टॉमरेड हॉटेल चालवतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची ब्राम्हण समाजाकडे दिलगिरी व्यक्त

News Desk

बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

News Desk

मुंबईत ओमायक्रॉनचे ३ रुग्ण, तर शहराच्या हद्दीत कलम १४४ लागू

News Desk