HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई डबेवाल्यांच्या मदतीला रोहित पवार पुढे सरसावले

मुंबई | मुंबईकर उपाशी राहू नये यासाठी घडाळ्यातील काट्याच्या वेगाप्रमाणे धावत लोकांना जेवणाचे डब्बे पोहोचवणारा ‘मुंबईचा डबेवाला’. मात्र कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे डबेवाल्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशातच आमदार रोहित पवार हे डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील डबेवाल्यांसाठी निधी उभा करून दिला आहे. शिवाय इतर नागरिकांनाही डबेवाल्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. “मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांच्या संघटनेचे सुमारे ५ हजार सदस्य असून अडचणीतील सदस्यांना मदतीचा हात देता यावा यासाठी त्यांनी एक निधी उभा केला आहे. आपल्याच परिवारातील घटक असलेल्या या डबेवाल्यांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर फोटोवरील नंबरवर संपर्क करावा.” असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीसाठी रामराजे नाईक-निंबाळकर सरसावले!

News Desk

मुंबईसह राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Aprna

तळीये दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात भर! १५ दिवसांनी एका महिलेचा मृत्यू

News Desk