HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर पडा आणि महाराष्ट्रात काय चालले आहे ते बघा, राजू शेटींचा मुख्यमंत्र्यांना टोला

बारामती | दूधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीवरुन माजी खासदार आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज ९२७ ऑगस्ट) बारामतीत चलो बारामती आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. “मुख्यमंत्री जरा डोळे उघडा,मातोश्रीच्या बाहेर पडा, आणि महाराष्ट्रात काय चालले आहे बघा. अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पध्दतीने चोरी करीत आहेत ते बघा….यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत, तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ असे सुरु आहे”,अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसह आघाडीतील आणि विरोधी पक्षावरही निशाणा साधला.

“सरकारी दूधखरेदी योजना सुरु झाल्यावरच यांचे दूध कसे वाढले, कागदी मेळ करुन सरकारी तिजोरी लुटण्याचे काम झालेले आहे. यात अनेक मंत्रीही सहभागी आहेत. हे सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर उघड्या डोळ्याने पाहत असतील तर उद्धवसाहेब दूध उत्पादकांनी हातात लोढण का घेऊ नये याचे उत्तर तुम्ही मला द्या”, असा प्रश्नही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

सरकारी खरेदी होऊनही दूधाचे भाव वाढत नसल्याने ही उत्पादकांची फसवणूकच असल्याचा गंभीर आरोप करत शेट्टी यांनी विविध ठिकाणच्या दूध संघांनी दिलेल्या भावांची आकडेवारीच वाचून दाखवली. गोमूत्र व शेणालाही दूधापेक्षा अधिक दर मिळतो, पाण्याची बाटलीही दूधापेक्षा महाग आहे, ही बाब राज्यकर्त्यांना शरम वाटायला हवी, अशी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अनेक जण दूध उत्पादकांच्या नावाने दरोडेखोरी करीत आहेत, दूध उत्पादकांच्या हक्काचा पैसा लुटला जात असल्याने आम्ही रस्त्यावर उतरल्याचे शेट्टी म्हणाले.

https://www.facebook.com/Rajushetti27/videos/2678860709019785/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भ्रष्ट व्यवस्थेने दिपालीसारख्या ‘लेडी सिंघम’चा बळी घेतला – चित्रा वाघ

News Desk

…तर राष्ट्रवादीचा मीच करेक्ट कार्यक्रम करेन; राजू शेट्टींचा इशारा

News Desk

नारायण राणे यांना शिवसेना का घाबरते?

News Desk