HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णांची वाढ !

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. सध्या देशात एकूण बाधितांचा आकडा हा ३३ लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या २४ तासांत देशात ७५,७६० नवे रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत २४ तासांत आढळलेल्या रुग्णांच्या संख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. तर, १,०२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ७,२५,९९१ एक्टीव्ह रुग्ण असून एकूण आकडा हा ३३,१०,२३५ इतका झाला आहे.

आत्तापर्यंतची देशात २५,२३,७७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६०,४७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. तसेच, २६ ऑगस्टपर्यंत देशात ३,८५,७६,५१० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ९ लाख २४ हजार ९१८ नमुन्यांची तपासणी काल (२६ ऑगस्ट) करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनता कर्फ्यूप्रमाणेच नागरिकांनी आपली पुढची जीवनशैली बदलावी – तुकाराम मुंढे

News Desk

देशात गेल्या २४ तासांत १२,८८१ नवे रूग्ण आढळले

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार 

News Desk