HW News Marathi
महाराष्ट्र

रियानेच माझ्या मुलाला विष देऊन मारले, सुशांतच्या वडलांचा गंभीर आरोप !

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येचा तपास आता सीबीआय करत आहे. दरम्यान, या तपासतात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. अशातच आता सुशांतच्या वडलांनी रिया चक्रवर्तीवर तिनेच आपल्या मुलाचा खुन केला आहे असा गंभीर आरोप केला आहे. ती बऱ्याच काळापासून माझ्या मुलाला विष देत होती. तिला आणि तिच्या साथीदारांना तातडीने अटक करण्याची मागणीही सुशांतच्या वडलांनी केली आहे.

कालच ( २६ ऑगस्ट) रिया चक्रवर्ती अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली होती. एका ड्रग डिलरसोबतचे तिचे व्हॉटसएप चॅटस समोर आले होते. यामध्ये रिया गौरवला एमडी म्हणजेच Methylenedioxymethamphetamine या अतिशय स्ट्राँग ड्रग्जविषयी विचारणा करताना दिसत आहे. याशिवाय, रिया सुशांतच्या चहा, कॉफी आणि पाण्यातही अंमली पदार्थ मिसळत असल्याची माहिती समोर आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk

बॉलिवूडला संपवण्याचा प्रयत्न केला तर… मुख्यमंत्र्यांचा इशारा

News Desk

शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनात पारित होणार – गृहमंत्री वळसे-पाटील

News Desk