HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरमध्ये ‘आमचं ठरलयं विकास आघाडी’ या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता

कोल्हापूर | कोल्हापूरमध्ये ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये ‘आमचं ठरलंय’ दिग्गज पक्षांना भिडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ या पक्षाला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवता येणार आहे. निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणी करुन घेतली आहे.

प्रमोद पाटील हे ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’चे प्रमुख असून गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे ते समर्थक आहेत. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड जागोजागी लावण्यात आले होते.

काय आहे ‘आमचं ठरलंय’ पॅटर्न?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. “आमचं ठरलंय” असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्याचा फटका महाडिक यांना बसला आणि त्यांना तब्बल २ लाख ७५ हजार मतांनी पराभवाचा सामना केला होता.

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी घेतलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी उपस्थिती लावली होती. याच मेळाव्यात सतेज पाटील यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीला खासदार मंडलिक यांनी जाहीर पाठिंबा तर दिलाच, पण त्याआधी ऋतुराज पाटील यांना शिवसेनेत येण्याचं आमंत्रणही देण्यात आले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करुणा मुंडेंची मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंकडे धनंजय मुंडेंची तक्रार, म्हणाल्या…

News Desk

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणार!

News Desk

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांना एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार 

News Desk