HW News Marathi
महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली ! नागपुरातून आता थेट मुंबई !

मुंबई | नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून मुंढे यांची बदली झाली आहे. त्यांच्या १४ वर्षाच्या कारकीर्दीत ही १४ वी बदली असावी असे म्हटले जात आहे.दरम्यान, तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली होती. दरम्यान, नागपूरमध्ये कोरोना परिस्थीती अगदी उत्तम पद्धतीने त्यांनी हाताळली होती.तसेच, महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध देखील त्यांनी लावले होते. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई देखील केली होती. मात्र, त्यांच्या या कामावरून महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद झालेले देखील पाहायला मिळाले होते.

कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे सुरुवातीला राज्याच्या एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली होती. त्यानंतर केवळ ७ महिन्यात त्यांची पुन्हा एकदा ट्रान्स्फर ऑर्डर निघाली आहे. आणि आता उपराजधानीतून थेट आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत त्यांची बदली झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय नौसेनेत कोरोनाचा शिरकाव, २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

१ महिन्यातच सरकार पडेल असे विरोधक सांगत होते, मात्र बोलतां बोलतां ५ वर्ष कधी पूर्ण होतील भाजपला कळणार पण नाही

News Desk

“शिवसेना, भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही पवार यांनी सरकार बनवलं” – रावसाहेब दानवे

News Desk