HW News Marathi
Covid-19

मनसे सर्वेक्षणातून समोर आली टक्केवारी, ७० टक्के लोकांना लॉकडाऊन पूर्णपणे संपावा वाटतो

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर एक सर्वेक्षण घेतले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे.

मनसेने विविध मुद्द्यांवर ७ दिवसात नागरिकांची मात्र जाणून घेण्याचा या सर्वेक्षणातून प्रयत्न केला आहे. ५४,१७७ नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली. याचा कौल आज (२५ ऑगस्ट)जाहीर करण्यात आला आहे.

१. लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?

होय – 70.3 टक्के

नाही – 26 टक्के

माहिती नाही – 3.7 टक्के

२. लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?

होय – 89.8 टक्के

नाही – 8.7 टक्के

माहिती नाही – 1.5 टक्के

३. लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी/उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?

होय – 8.7 टक्के

नाही – 84.9 टक्के

माहिती नाही – 6.4 टक्के

४. राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?

होय – 32.7 टक्के

नाही – 52.4 टक्के

माहिती नाही – 14.9 टक्के

५. शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?

होय – 10.3 टक्के

नाही – 74.3 टक्के

माहिती नाही – 15.4 टक्के

६. लोकल रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?

होय – 76.5 टक्के

नाही – 19.4 टक्के

माहिती नाही – 4.1 टक्के

७. लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय – 8.3 टक्के

नाही – 90.2 टक्के

माहिती नाही – 1.5 टक्के

८. लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य मिळाली आहे का?

होय – 25.9 टक्के

नाही – 60.7 टक्के

माहिती नाही – 13.4 टक्के

9/९. या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय – 28.4 टक्के

नाही – 63.6 टक्के

https://www.facebook.com/978575178864739/posts/3198126356909599/

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देणार !

News Desk

ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली जाहिर

News Desk

भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण

News Desk