HW News Marathi
Covid-19

मोदी आणि जो बायडन यांच्यात फोनवरुन ‘या’ विषयावर झाली चर्चा…

नवी दिल्ली | देशात वाढत्या कोरोनाचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होताना दिसत आहे. असं असताना इतर अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत आहे. नुकतंच अमेरिकेने कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची ग्वाही दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली असताना युरोपिअन युनिअन, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड तसंच अनके देश मदतीसाठी पुढे सरसावत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं असून दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. तसंच मदतीचं आश्वासन दिल्याबद्दल आपण जो बायडन यांचे आभार मानल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.जो बायडन यांच्याबरोबरील चर्चा चांगली झाली. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या करोना स्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. अमेरिकेकडून भारताला देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मी जो बायडन यांचे आभार मानले,” असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय भारताकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा झाली. अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर, कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसंच इतर साधनसामग्री पुरवली जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोना लसीच्या निर्मितीसाठी कच्चा माल अमेरिका पुरवणार

अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला यांनी जो बायडन यांनी कच्चा मालाचा तुटवडा झाला आहे त्यामुळे पुरवठा लवकर करण्यासाठी ट्विट करत मागणी केली होती.

अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….आणि मोदी चूकून म्हणाले, “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या”,व्हिडीओ झाला व्हायरल

News Desk

फडणवीसांनी ब्राम्हणांसाठी केलेल्या घोषणांच्या ठाकरे सरकारने बोऱ्या वाजवला ! चंद्रकात पाटलांची टिका

News Desk

भाजप खासदार नारायण राणे कोरोना पॉझिटिव्ह

News Desk