HW News Marathi
महाराष्ट्र

महाड इमारत दुर्घटनेत ६० जणांना वाचवण्यात यश तर एकाचा मृत्यू

रायगड | काल (२४ ऑगस्ट) रायगड जिल्ह्यातील महाड शहरात एक भीषण इमारत दुर्घटना घडली. ५ मजली इमारत काल जमीनदोस्त झाली आहे. यात ४० पेक्षा जास्त कुटुंब राहत होते. त्यातील ६० जणांना आतापर्यंत बाहेर काढलं असून आतापर्यंत या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर काही लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ओफ्रेशन रात्रभर सुरु आहे. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

“एनडीआरएफचे ३ पथक बाचाव कार्य करत आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर ६० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप २५-३० जण अडकल्याची शक्यता आहे”, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्यटकांच्या सोयीसाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसर आकर्षक करणार! – आदित्य ठाकरे

News Desk

राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार, मनसेची आक्रमक भूमिका 

News Desk

राज्यपाल आमच्यावर न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk