HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी स्वत:ला महाराष्ट्र द्रोही केलं, शुभम शेळकेंचा घणाघात!

बेळगाव | आज(१७ एप्रिल) बेळगाव लोकसभा पोटनिवडणूसाठी मतदान सुरु आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी मतदानाचा हक्कही बजावला. यानंतर त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बेळगाव दौऱ्यावर भाष्य केले आहे. हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्र द्रोही सिद्ध केलं आहे, अशा शब्दांत शुभम शेळके यांनी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

“आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रातून समिती विरोधात प्रचाराला कोणी येणार नाही. कारण हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना सुरुवातीपासून या लढ्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस आणि भाजप यांना या प्रश्नाचे सोयर सुतक आहे. असं वाटत नाही. मुळात हा प्रश्न निर्माण केला काँग्रेसने आणि भाजपला या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. ज्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे आम्हाला फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नाहीत, असंही शुभम शेळके यांनी म्हटले आहे.

“मतदानाचा हक्क लोकशाहीने दिलेला आहे. त्या माध्यमातून मी मतदान केलं. माझा अनुक्रमांक ९ असल्याने ‘नव’मतदार म्हणून मी मतदान केलं असून ९ शुभांक मानला तरी वावगं ठरणार नाही. मराठी माणसाने ठरवलं की आपल्या माणसाला मतदान करायचे तर आमचा विजय दूर नाही. मी लहानपणापासून या लढ्याशी जोडलो गेलो आहे. पण अलिकडच्या काळात बेळगावात इतका उत्साह पहिल्यांदाच पाहायला मिळाला” असं शुभम शेळके म्हणाले आहेत.

“आमचे अंतिम ध्येय महाराष्ट्रात सामील होणे हेच आहे. इथे मराठी माणसाची गळचेपी होते, शिवरायांचा अपमान, शिवरायांची साक्ष देणाऱ्या भगव्या झेंड्याची विटंबना, याची चीड व्यक्त करण्याचे माध्यम ही निवडणूक आहे. इथे लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढायला मराठी माणूस ही निवडणूक संधी म्हणून पाहात आहे” असंही शेळके म्हणाले. त्यामुळे शुभम शेळके यांचा विजय होणार का हे २ मेला होणाऱ्या मतदान मोजणीत पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव अभिवादनासाठी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आजाद १ जानेवारीला उपस्थित राहणार

News Desk

नितेश राणेंना दिलासा! १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna

“महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची”, मेट्रो कारशेडवरुन शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

News Desk