HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत दाखल होणार, पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

यवतमाळ | शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड हे पोहरादेवीतून निघाले आहेत. ते कोणत्याहीक्षणी पोहरादेवीत पोहोचणार आहे. राठोड येणार असल्यामुळे पोहरादेवीत त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली असून त्यांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्य वाजवून जल्लोष केला जात आहे. त्यामुळे पोहरादेवीत जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. समर्थकांची अफाट गर्दी पोहरादेवी मंदिराच्या परिसरात दिसत आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप झाल्यानंतर तब्बल १५ दिवसानंतर संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीत दर्शनासाठी येत आहेत. राठोड पोहरादेवीला येणार असल्याने या ठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी होम हवनही करण्यात येत आहे.

या ठिकाणी अनेक राठोड यांचे समर्थक पारंपारिक वेषात आले आहेत. काहींनी तर पारंपारिक वेषात ढोलताशे वाजवून गाणे गात राठो यांच्या स्वागताची तयारी केली आहे. पोहरादेवी परिसरात लोक वाद्य वाजवून नाचत आहेत. बंजारा भाषेतील लोकगीतंही म्हटलं जात आहेत. राठोड यांच्या स्वागतासाठी आम्ही आलो आहे. त्यांना पूजा चव्हाण प्रकरणात बदनाम केलं जात आहे, असं राठोड समर्थकांचं म्हणणं आहे. संजय राठोड आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणाही यावेळी दिल्या जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

“कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही”, राऊतांना शेलारांचे प्रत्युत्तर

News Desk

रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही! – उपमुख्यमंत्री

Aprna