HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना नेते संजय राठोड पोहरादेवी गडावर दाखल

वाशिम | शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी गडावर दाखल झाले आहेत. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राठोड यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर काही दिवस राठोड कोणाच्याही संपर्कात नव्हते. मात्र, आता ते लोकांसमोर आले आहेत. पोहरादेवी मंदिराच्या परिसरात राठोड यांच्या समर्थकांची, शिवसेना नेते, कार्यकर्ते यांची तुफान गर्दी जमली आहे. संजय राठोड यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी केली आहे. राठोड पत्नीसह गडावर पोहोचले आहेत.

तब्बल ४० किलोमीटरचं अंतर कापून अखेर वन मंत्री संजय राठोड यांचा ताफा अखेर पोहरादेवीत दाखल झाला आहे. पोहरादेवी मंदिर परिसरात आल्यानंतर सर्वात आधी ते संत सेवालाल महाराज यांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते सहकुटुंब पोहरादेवीचं दर्शन घेणार आहे.

संजय राठोड हे साधारण १०.५५ च्या सुमारास यवतमाळमधून पोहरादेवीकडे सहकुटुंब रवाना झाले होते. हे ४० मिनिटांचं अंतर कापून ते तासाभरात पोहरादेवीत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते, पदाधिकारी आहेत. तब्बल २० वाहनांच्या ताफ्यासह ते पोहरादेवीत आले आहेत. यावेळी मंदिर परिसरात हजारो लोक जमले आहेत. त्यामुळे राठोड यांची गाडीला वाट मिळण्यासाठी मोठी अडचण होत असून पोलीस या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, राऊतांचा आरोप

Aprna

राणा दाम्पत्यासह १४ कार्यकर्त्यांवर रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकर लावल्यामुळे गुन्हा दाखल

Aprna

मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी 200 कोटी, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk