HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार, नरोत्तम मिश्रा यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे भावी अध्यक्ष म्हणून थेट प्रियंका गांधी यांच्या मुलांच्या नावांचा दावेदारीसाठी विचार करता येईल असा सल्ला मिश्रा यांनी दिला आहे. तसेच ”काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार” असं म्हणत नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

“काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक पात्र उमेदवार त्यांच्या पक्षाकडे आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, रिहान वढेरा, मिरयाना वढेरा यांचा समावेश आहे. काँग्रेस ही अशी शाळा आहे जिथे मुख्याध्यापकांची मुलं पहिली येतात, हे काँग्रेसच्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे” असे नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजभवनावर पोहोचले

News Desk

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे तोंड बंद !

News Desk

शरद यादवचा आरजेडीला पाठिंबा-लालू

News Desk