HW News Marathi
देश / विदेश

शत्रुघ्न सिन्हांचा मोदींवर पून्हा एकदा हल्लाबोल 

– गुरूदासपूरचा पराभव मानहानिकारक

दिल्ली – भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पून्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले आहे. मोदी निती विरोधात सतत टिका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरूदासपूर पोटनिवडणूक भाजपच्या झालेल्या पराभवावरून चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अपेक्षे प्रमाणे गुरुदासपूर लोकसभा पोटनिवडणुकीत जवळपास दोन लाख मतांच्या फरकानं भाजपला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला, अशी शब्दात त्यांनी मोदींनाच सुनावले आहे. लोकसभेच्या पंजाबमधील गुरुदासपूर जागेसाठी पोटनिवडणूक झाली.

त्यात काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांनी भाजप उमेदवार स्वर्ण सिंग सलारिया यांचा जवळपास २ लाख मतांच्या फरकानं पराभव केला. या नंतर सिन्हा यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला. शिवाय दिवंगत विनोद खन्ना यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पराभव अपेक्षितच होता असेही खन्ना म्हणत भाजपलाच घरचा आहेर दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल आणि महाविकास आघाडी मंत्र्यांची भेट!

News Desk

“…तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागणार” – मोहन भागवत यांचं मोठं विधान

News Desk

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम !

News Desk