HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांवरील पीएचडी अपूर्ण पण आता अजित पवारांवर अभ्यास करणार – चंद्रकांत पाटील

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करणार असल्याच्या मुद्यावरुन भाष्य केले आहे. पण यावेळी त्यांनी अजित पवारांवरही अभ्यास करणार असल्याचे म्हटले आहे. एबीपी माझाशी बोलत असताना त्यांनी या इच्छा बोलून दाखवल्या आहेत.

“मला कधी कधी आश्चर्य वाटतं. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी अभ्यास कऱणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांना भेटणार आहे. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे यांच्यावर सिंचनच्या केसेस, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही”.

“महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री….उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना सुनावले आहे.

या आधीही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर पीएचडी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे. ५० वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता आला नसल्याचा टोलाही चंद्रकांतदादांनी पवारांना लगावला होता.

शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते ५० वर्ष राजकारणात आहेत, तरीही त्यांचा पक्ष दहापेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय?’ असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटलांनी टोमणा मारला होता.

‘शरद पवार एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांना आपलं म्हणणं कसं काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे’ असं चंद्रकांत पाटील तिरकसपणे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन  कार्यवाही केली असती तर…

News Desk

BharatBandh | शिवसेना बंदात सहभागी झाली नाही, तरी देखील बंद यशस्वी | अशोक चव्हाण

swarit

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

News Desk