HW News Marathi
महाराष्ट्र

“आखिर तुम केहना क्या चाहते हो?” निलेश राणेंचा 3 इडियट्सचा डायलॉग म्हणत टोला

मुंबई | ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद सगळ्यांनाच माहित आहे. राणे पिता-पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका अनेकवेळा करत असतातच. आताही महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे १५ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या लांबलचक भाषणामुळे भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांना कितीही वेळा ऐकलं तरी काहीही समजत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाहून मला 3 इडियट्सचा मधला ‘तुम केहना क्या चाहते हो?’ हा डायलॉग आठवतो, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीचा अहवाल जनतेसमोर मांडला. त्यानंतर त्यांनी राज्यात संचारबंदीची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांचं हे भाषण लांबलचक झालं होतं.

तर याआधीही निलेश राणे यांनी, ठाकरे सरकारचा पहिला उपाय पण लॉकडाऊन आणि शेवटचा उपाय पण लॅाकडाऊन. आता म्हणतात कोरोनाची साखळी तोडायची आहे मग मधले काही महिने साखळी तुटली होती तेव्हा अंगठा का चोखत बसले? स्वतःचं अपयश झाकण्याची शिक्षा सामान्य जनतेला का देताय? असा सवाल राणेंनी उपस्थित केला होता.

काय म्हणाले होते नितेश राणे?

कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा, असं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांवर सोडलंय. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगलं वाटत असेल, असा टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ब्रेक द चेन नाही तर चेक द ब्रेन, असे खोचक ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बावनकुळेंवर अन्याय झाला तेव्हा इतका गलबललो नव्हतो, अमोल मिटकरींचे सुचक ट्विट

News Desk

‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या आणि समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या! – अजित पवार

Aprna

विनापरवाना मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार श्वेता महाले म्हणतात, “होय, आम्ही गुन्हेगार…”

Aprna