HW News Marathi
महाराष्ट्र

“किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी”, संभाजीराजे झाले आक्रमक

पंढरपूर | रायगड किल्ल्यावर पुरातत्व खात्याकडून शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती प्रकाशव्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या प्रकाशव्यवस्थेवर शिवरायांचे वंशज आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारतीय पुरातत्व खात्यासाठी हा काळा दिवस असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं होतं. त्यावरुन शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संभाजीराजेंना दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह वाटतं, असा टोला लगावला होता.

दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजीराजेंची बाजू घेतली होती. त्यानंतर आता संभाजीराजे यांनी या विषयावर भूमिका मांडली. पंढरपूरात ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे या विषयामुळे आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

संभाजीराजे काय म्हणाले?

“मी काहीही राजकीय फायदा घेतल्याचा, स्टंट केल्याचं दाखवा, तसं दिसलं तर मी माझी खासदारकी फेकून देतो. मी समाजासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजीराजेंना टारगेट केल्यास टीआरपी वाढतो”, असा टोला संभाजीराजेंनी लगावला आहे.

“मी भाजपकडून खासदार आहे म्हणून त्यांची शाल घेऊन फिरत नाही. पण किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे. मी कधीच राजकारण केलं नाही आणि करत नाही. माझा राग पुरातत्व खात्यावर आहे. किल्ल्यावरून मला राजकीय टॅग करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे”, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

“शिवजयंतीच्या दिवशी रायगड किल्यावर करण्यात आलेली विद्यूत रोषणाई पाहून पुरातत्व खात्यासाठी कालचा दिवस हा खरंच काळा दिवस आहे. महाराजांचे वास्तव, समाधी असलेल्या रायगडावर अशी लायटिंग चुकीची आहे. पुरातत्व खात्याने गाईडलाइन तयार करावी. रायगड मॉडेल प्रमाणे दहा किल्ले संवर्धनासाठी घेणार. किल्ले जतन करण्यासाठी फोर्ड फेडरेशन स्थापन करण्यात आली आहे. पण जतन आणि संवर्धनचा अर्थ देखील पुरातत्व विभागाला माहिती आहे का?”, असा सवाल देखीलसंभाजीराजेंनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यवतमाळमध्ये भीषण अपघात, १० जण जागीच ठार

News Desk

“कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष द्या”- मुख्यमंत्री

Aprna

बीडमध्ये राजकीय वातावरण तापले, शिवसंग्रामचे १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

News Desk