HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुख CBI चौकशीला आज सामोरे जाणार 

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांसंदर्भात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज (१४ एप्रिल) CBI कडून चौकशी केली जाणार आहे.अनिल देशमुख यांना जबाब नोंदवण्यासाठी सकाळी ११ वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

याआधी अनिल देशमुख यांच्या २ स्वीय सहाय्यकांची सीबीआयने कसून चौकशी केली होती. देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची झाडाझडती घेण्यात आली होती. तसेच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्याकडूनही सीबीआयने चौकशी करत माहिती घेतली होती. या सगळ्या माहितीच्याआधारे सीबीआयचे अधिकारी आज अनिल देशमुख यांची चौकशी करणार आहेत. या सगळ्यावर अनिल देशमुख काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक आणि महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे आजच्या अनिल देशमुख यांच्या चौकशीत आणखी कोणते नवे खुलासे समोर येणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हेलिकॉप्टरमुळे लोकसभेचं तिकीट गेलं! सुजय विखेंच्या या आरोपात तथ्य नाही,राष्ट्रवादीने दिले उत्तर

News Desk

गडकरींचा मनोहर जोशी ‘सरां’ना वाकून नमस्कार

News Desk

नाणार प्रकल्प आता रत्नागिरी ऐवजी ‘इथे’ येणार

News Desk