HW News Marathi
महाराष्ट्र

गडकरींचा मनोहर जोशी ‘सरां’ना वाकून नमस्कार

मुंबई | भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर एकमेकांवर विषारी भाषेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या टोकांच्या मतभेदांमध्येही दोन्ही पक्षांतल्या दोन ज्येष्ठ नेत्यांमधल्या राजकारणापलीकडचं नात्याची आज खूप चर्चा होताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी मनोहर जोशी यांना वाकून नमस्कार केला.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे पक्षातर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. राजकीय वर्तुळात मनोहर जोशींना प्रेम आणि आदराने ‘सर’ असे संबोधले जाते. राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून मनोहर जोशी वयोमानापरत्वे दूर झाले असले, तरी आजही दिग्गज नेत्यांशी त्यांचे घट्ट नाते आहे. मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट घेतली. गडकरींनी मनोहर जोशींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.१९९५च्या युती सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गडकरी हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. याच स्नेहाच्या नात्याला आज उजाळा मिळाला. कधीकाळी शिक्षक असलेले मनोहर जोशी हे ‘सर’ या नावाने ओळखले जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातूरमध्ये एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

News Desk

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

swarit