HW News Marathi
महाराष्ट्र

वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड असल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिलीये, रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोला

मुंबई | राज्यात सध्या आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकासआघाडी सरकारला शिकवू नये,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपला दिला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. यावरुन भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

“महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांना मी आठवण करुन देते की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याची बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे. मुन्ना यादव सारख्या गुंडांला महामंडळ देणाऱ्या, तत्कालीन गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे,” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टोळीने तरी राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये,” अशी घणाघाती टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार!

News Desk

मध्य वैतरणा जलाशयातून होणार विज निर्मिती, मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी

News Desk

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याने घेतला पहिला बळी

swarit