HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत”

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. याआधी मुंबई पोलीस हा तपास करत असताना भाजपकडून मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार टीका सुरु होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणत त्यांनी ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.’ अशा शब्दात टीका केली आहे.

“सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून सुशांत सिंहला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं रोहित पवार म्हणाले. तसंच सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ “, असे.म्हणत त्यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकच्या सुला वाईन्सची प्रेरणादायी वीजनिर्मिती

News Desk

मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

‘हिरोईन’ शब्दाचा अर्थ नायिका म्हणजे कर्तबगार महिला, लोणीकरांचे स्पष्टीकरण

swarit