HW News Marathi
महाराष्ट्र

CBIचे पथक मुंबईत ७ दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आले तर क्वारंटाईन केले जाणार नाही – आयुक्त

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याप्रकरणातील सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आले तर त्यांना क्वारंटाईन केले जाणार नाही. मात्र, सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सीबीआयचे अधिकारी मुंबईत येतील तर त्यांना मुंबई महापालिकेला ईमेल करुन क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी अर्ज कारावा लागेल. त्यानंतर आम्ही त्यांची क्वारंटाईन पीरियडमधून सूट देऊ”, असं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले आहेत.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केलं आहे. मुंबई पोलीस सीबीआयच्या तपासाला सहकार्य करेल, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. “सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात कोणताही दोष आढळलेला नाही. मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नाही, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल – प्राजक्त तनपुरे

News Desk

नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालायचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Aprna

मनमोहन सिंग यांच्या काळात पेट्रोलचा दर किती आणि आता किती?,अर्थसंकल्पात बोलेनच, अजित पवार बरसले

News Desk